Posts

Showing posts from August 16, 2023

संपूर्ण देश दररोज पितोय ५० कोटी लिटर 'नकली' दूध

Image
संपूर्ण देश दररोज पितोय ५० कोटी लिटर 'नकली' दूध. ॲनिमल वेलफेअर बोर्ड सदस्य अहलुवालिया : पशुंची संख्या घटताना सरकार 'व्हाइट रेव्होल्युशन' यशस्वी झाल्याचा दावा कसा करते? संपूर्ण देश दररोज पितोय ५० कोटी लिटर 'नकली' दूध. सोपान पांढरीपांडे । लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : देशात दुधाचे रोजचे उत्पादन १५ कोटी लिटर असताना केंद्र सरकारचे स्वास्थ्य व विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय देशात ६४ कोटी लिटर दूध रोज विकले जात असल्याचा दावा करत आहेत. त्यामुळे देशात रोज सुमारे ५० कोटी लिटर 'नकली' दूध विकले जात असल्याचा निष्कर्ष निघतो, असे परखड मत अनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडियाचे सदस्य मोहनसिंग अहलुवालिया यांनी व्यक्त केले. अहलुवालिया यांनी लोकमतशी सांगितले की, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री हर्षवर्धन यांनी दुधाचे रोजचे उत्पादन १५ कोटी लिटर व खप ६४ कोटी लिटर असल्याचे लोकसभा व राज्यसभेत मार्च २०१८ मध्ये सांगितले. हे अतिरिक्त दूध खासगी कंपन्या पुरवतात. देशातील ६८.७० टक्के दूध फूड सेफ्टी व स्टैंडर्ड अॅथारिटीच्या निकषांवर नापास झाले आहे. डिसेंबर २०१६ मध्ये सर्वोच्च न्यायालयान