Posts

Showing posts from July 3, 2023

PM KISAN

Image
                    Pm Kisan Scheme :   जव्हार :   दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर पंतप्रधान किसान योजनेचे दोन हजार रुपये जमा होतात. खरीप हंगामासाठी पावसाळ्यापूर्वी दोन हजार रुपये मिळतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती; मात्र अद्यापही जव्हार तालुक्यातील ११,७५४ शेतकऱ्यांच्या खात्यावर योजनेच्या चौदाव्या हप्त्याचे पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे योजनेचा हप्ता कधी जमा होणार, याची प्रतीक्षा शेतकरी करत आहेत केंद्र सरकारकडून दर चार महिन्याला दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात. यामध्ये कधीही खंड पडला नव्हता. पीएम किसान योजनेचा चौदावा हप्ता हा ३० मे रोजी जमा होणार होता. त्यामुळे हप्ता जमा झाला का, याची शेतकरी बँकेत चौकशी करतात परंतु आता २९ जून उजाडला, तरीही योजनेचा हप्ता जमा झाला नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. सध्या खरीप हंगामासाठी खत, बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. गेल्या आठवड्यापासून मान्सूनने हजेरी लागल्याने पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे. Also read: Pm kisan : ‘पीएम किसान’च्या हप्त्याची अद्याप प्रतीक्षा साहित्य खरेदीसाठी मदत राज्य सरकारने पीएम किसान योज